logo

चिंचवड:मनोज शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सक्षम लोकशाहीसाठी सक्

चिंचवड:मनोज शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सक्षम लोकशाहीसाठी सक्षम अधिकारी आयपीएस कृष्ण प्रकाश यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासनाने खंबीर उभे राहावे याबाबत निवेदन इमेल द्वारे देण्यात आले.

यावेळी निवेदनात म्हटले आहे की, आम्ही रयत विद्यार्थी परिषद आपणाकडे पुरोगामी महाराष्ट्रात शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा जपत महाराष्‍ट्र प्रगती करीत आहे.या पुरोगामी महाराष्ट्राला अखंड सामाजिक, शैक्षणिक, राजकीय,औद्योगिक, कृषीप्रधान वारसा लाभलेला आहे. परंतु काही समाज विघातक शक्ती महाराष्ट्राला सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.

महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील तसेच प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींना खोट्या आरोपाखाली बदनाम करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत.असाच एक प्रयत्न पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर स्थानिक आमदार अण्णा बनसोडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांचं नाव वापरून आपल्याकडे लेखी तक्रार दाखल करत कृष्णप्रकाश यांच्यावर शेकडो कोटी रुपयांची वसुली केल्याचे आरोप केला आहे हे सर्व आरोप बिनबुडाचे व निराधार आहेत. असे सामान्य जनतेला वाटत आहे आणि हे सत्य आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी घाईगडबडीत व तात्पुरत्या स्वरूपात कार्यान्वित करण्यात आले होते.आज पर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताच्या बदली इतिहास पाहता मुदतपूर्व बदली पिंपरी चिंचवडकरांना नवीन नाही व आयुक्त कृष्ण प्रकाश यांनाही नवीन नाही.पोलिस आयुक्तांनी पदभार स्वीकारते वेळी थेट इशारच देत "मी बदलीला घाबरणार नाही.मी कायदा पाळणारा माणूस आहे. एक तर कायदा बदला किंवा मला बदला थेट शब्दात भूमिका मांडली होती.

पिंपरी चिंचवड चे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना माहिती होती की आपली बदली कधीही होऊ शकते. याची पूर्ण कल्पना होती. आम्ही पिंपरी चिंचवडकरांनी दोनच सक्षम अधिकारी आज पर्यंत पाहिले एक पिंपरी-चिंचवड पालिकेचे माजी आयुक्त श्रीकर परदेशी तर दुसरे पिंपरी चिंचवड माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश या दोघांनी शहराच्या विकासाला दिशा देते कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यात सिंहाचा वाटा आहे असे म्हणावे लागेल. सामान्य जनतेला आपल्या कार्याने प्रभावित केले आहे याचे कार्य जनतेच्या लक्षात आहे.

आयुक्तांनी पदभार स्वीकारताना झिरो टॉलरन्स ही संकल्पना घेऊन त्यांनी आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला "सामान्यातील सामान्य फिर्यादीला सौजन्याची वागणूक आणि बड्या आरोपींना कायद्याचा फास " या कार्य पद्धतीमुळे पिंपरी-चिंचवडकरांना आयुक्त आपलेसे वाटत होते. शहरात सामान्य नागरिकां मध्ये मिळून तसेच समाजात सलोख्याचे नाते निर्माण करण्यावर सतत भर दिला. यामुळे पोलीसांन बाबतची भीती मनातून निघून गेली त्या ठिकाणी पोलिसांप्रती आदरभाव निर्माण झाला.
अशातच कृष्णप्रकाश यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक थेट सामाजिक केला या क्रमांकावर तक्रार देणाऱ्या बाबत पूर्णपणे गुप्तता पाळली जात होती. यामुळे नागरिकांनी आपले गाऱ्हाने थेट आयुक्तांजवळ मांडत होते या तक्रारीवर आयुक्तालयातून कारवाईच्या सूचना दिल्या जात असत तसेच त्याच्या पाठपुरावाही केला जात होता. त्यामुळे स्थानिक पोलिसांचे मॅनेजमेंट संपुष्टात आले हे मात्र नक्की यामुळे स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद घेण्याचे प्रमाण वाढले.

या उद्योगनगरीत जमिनींना मिळणारे सोन्याचे भावा आणि वाढते उद्योगधंदे यामुळे प्रस्तापित टोळ्यासह गल्ली बोळातील भाईगिरी आणि त्यातून अनेक छोट्या-मोठ्या टोळ्या निर्माण झाल्या कृष्ण प्रकाश सरांनी पदभार स्वीकारल्यानंतर २०२०मध्ये वर्षभरात ०९ टाेळ्यांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.विशेष म्हणजे २०२१ मध्ये अवघ्या दोन महिन्यात ६ टोळ्यांसह ३९ गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आला. या गुन्हेगारांवर कारवाई शहराच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खूप मोठी कारवाई होती किरकोळ कारणातून राडेबाजी करण्याचे फॅड शहरात वाढत होते. गावगुंडकडून वाहनांची तोडफोड,आरडाओरडा करत परिसरात दहशत पसरवली जाते.परिसरात वर्चस्व निर्माण करून त्यातून हप्ते वसुली किंवा मोठ्या गुन्हेगारी कारवाई करणे हा त्यामागील उद्देश असायचा या गावगुंडांना कायमची अद्दल घडवण्यासाठी गावगुंडाच्या परिसरातमध्ये घुसून पोलिसांनी सर्वांसमोर काठीचा प्रसाद देत गावगुंडांची सर्रास धिंड काढली.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या ठोका आणि मोका या पॅटर्नमुळे पोलिसांनाही फ्रीहँड मिळत असून अनेक टोळ्या पोलिसांच्या रडारवर आल्या यामुळे शहरातील अनेक गुन्हेगार आणि दादा भाई अंडरग्राउंड झाल्याचे चित्र निर्माण झाले. गुन्हेगार नगरसेवक ही या कारवाईमुळे धास्तावले पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये तब्बल २६ नगरसेवक रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत तसेच अनेक महिला नगरसेवकांचे पती वर ही गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये जवळजवळ सर्वच पक्षांच्या नगरसेवकांचा समावेश आहे. सामाजिक सुरक्षा पथक स्थापन करून शहरातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत सरस चालणाऱ्या अवैद्य धंदे,मटका, हुक्का पार्लर, वेश्याव्यवसाय इ शहरात अशा विविध ठिकाणी छापे मारून बंद केले.

तसेच या अवैध धंद्यांना अभय प्रदान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा सामाजिक सुरक्षा पथकाने धडक कारवाई केल्याचे आम्ही बघितले. सट्टेबाजांना स्टिंग ऑपरेशन करून जेरबंद केले कधी कधी तर वेषांतर करून स्वतःच्याच खात्यातील पोलिसांची झडती घेतली. कायदा सुव्यवस्था पाळले जाते की नाही हे जातीने लक्ष घालूनपोलिस आयुक्त कृष्णप्रकाश पाहत होते. समाजात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता छोटा किंवा मोठा फरक न करता कायदा सर्वांसाठी समान या कायद्याने सामाजिक कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण दिले. समाजात सलोखा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, नाट्य अशा अनेक कार्यक्रमांना मार्गदर्शन करून पोलिसांप्रती नागरिकांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण व्हावी असे उपक्रम राबवले.

पोलीस दलातील सहकाऱ्यांच्या आणि मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी अनेक उपक्रमही राबवले. कायद्यासमोर सर्व समान या समानतेच्या कायद्यांनुसार पोलीस कारवाई करताना कोणताही भेद कृष्ण प्रकाश यांनी कधी पाळला नाही.पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तपास करत असताना आमदार पुत्राचे विरोधात गंभीर तक्रारी आल्यावर राजकीय दबाव झुगारून सत्तेत असणार्‍या आमदाराच्या मुलावरही गुन्हा दाखल केला‌.कोणत्याही दबावाला बळी न पडता आमदार पुत्रावर खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गंभीर गुन्हे दाखल केले.

तसेच अनेक दिवस फरारी असणाऱ्या आमदार पुत्राला अटकही केली याशिवाय पिंपरी कॅम्पातील बुगगी, अमित कलाटे आणि औंध येथील राहुल जुनवणे सह राजकीय पाठबळ आणि वजन असणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. पिंपरी-चिंचवड मधील अमर मुलचंदानी हाय प्रोफाईल कॉन्टॅक्ट असणारे वजनदार नेते म्हणून ओळखले जातात दि सेवा विकास बँकेतील घोटाळा प्रकरणी ते अडचणीत आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करताना कोणच्याही दबावास बळी न पडता गुन्हे दाखल केले. नानासाहेब गायकवाड औंध येथील मोठे प्रस्त चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे ते मावस भाऊ आहेत. घरगुती हिंसाचारासह जमीन बळकावणे, खुनाचा प्रयत्न करणे असे अनेक गंभीर गुन्हे एकापाठोपाठ एक दाखल करत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. एक प्रकारे व्हाइट कॉलर गुन्हेगारी यांची कुंडली काढण्याचे काम आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सुरू केले होते. थेट निवडणुकीच्या तोंडावर कारवाई होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी आयुक्त बद्दल अफवा पसरवणे,खोटे आरोप करणे सुरू केले.

अनेकांनी तर आयुक्तांच्या बदलीसाठी मंत्रालयाच्‍या वाऱ्या सुरू केल्या व आपले देव देखिल पाण्यात ठेवले ,तर काहींनी खोटेनाटे आरोप करून बदनामीचा प्रयत्न सुरू केला. अखेर महाराष्ट्र शासनाचा बदलीचा आदेश आल्यामुळे अखेर बदली झाली.आयुक्तांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करावा अशी अपेक्षा पिंपरी चिंचवड मधील सर्वसामान्य जनतेला होती. परंतु शासनाच्या आदेशाचा मान ठेवत त्यांनी सुद्धा बदली स्वीकारली परंतु आयुक्त पदावरून कृष्णप्रकाश जातात बदनामीचे वादळ घोंगावत आपल्या जवळ लेखी स्वरूपात आले.

पोलीस खात्याला बदनाम करण्याचे उद्देशांनी हा डाव रचला जातोय की काय असा प्रश्न विद्यार्थी म्हणून सामान्य नागरिक म्हणून आम्हाला पडला आहे. विशेष आणि गंभीर बाब म्हणजे विद्यमान आमदारांचे नाव वापरून पोलीस दलाला बदनाम करण्याचे कट कसे काय रचले जातात ? हा प्रश्‍न अनुत्तरितच राहतो.पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी सतत आणि खोटे बिनबुडाचे आरोप केले जातात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न आपण सर्वांनी हाणून पाडले पाहिजे महाराष्ट्राचा असा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही.

सक्षम लोकशाहीसाठी सक्षम अधिकारी या घोषवाक्य प्रमाणे आपणही सक्षम अधिकारी आयपीएस कृष्णप्रकाश यांच्यासोबत उभे राहून महाराष्ट्रातील जनतेला संदेश द्यावा आणि आम्ही रयत विद्यार्थी परिषद आपणाकडे मागणी करू इच्छितो की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदी कृष्ण प्रकाश सर यांना पुन्हा आयुक्त म्हणून संधी द्यावी. तसेच आपण लोकशाहीला मजबूत करण्याच्या उद्देशाने सक्षम लोकशाहीसाठी सक्षम अधिकारी या घोषवाक्य प्रमाणे येत्या काळात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत अशी आपणाकडे नम्र विनंती करतो.

जेणेकरून प्रामाणिक अधिका-याप्रति आदराची भावना निर्माण होईल तसेच आम्ही रयत विद्यार्थी परिषद आपणाकडे सक्षम अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे अशा भूमिकेतून हे निवेदन देऊन अशी मागणी रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना केली आहे.

11
14677 views
  
1 shares